Thursday 23 September, 2010

परत मनाने विवेकावर केलेली मात.

'श्री राम समर्थ '

आज मला पक्के समजले.........मी आयुश्यात फारच कमी शीकलो........
जे शीकायला हवे होते ते शीकलोच नाही........म्हणुनच शाश्वत असा आनन्द जो मनुश्य जन्माला
येउन मीळ्णे भाग आहे तो मीळालाच नाही.

असे का होते कळत नाही. आता असे कुणीही रहिले नाही जाच्यावर मी रागवू शकेन, त्यामुळे असेल कदाचीत, मला महाराजांचा आज राग आला. माझ्या मनातील ईच्छा पूर्ण होवू द्यायचीच नाही असेच कदाचीत महाराजांनी ठरवले आहे का कुणास ठाऊक. जर त्यांना माहित आहे की मी परिक्षेत पास होणारच नाही, तर ते परीक्षा का घेतात? याच उत्तर हवे असेल तर एकच मार्ग आहे...............................

बहूतेक यासाठी सुधा "नाम" हेच उत्तर आहे. पहातो मी महाराजांच्या क्रुपेने नाम घेउन अणी मग पाहु मी कोण आहे हे मला कळतय का?

Sunday 25 July, 2010

'श्री राम समर्थ '
कालच आमच्या college मधे "समारम्भ"cultural event झाला.माझ्या मनात एक इच्छा उत्पन्न झाली.
कान्ता असावी तर जानकी सारखी (हे मझ्या वर्गातल्या कुठल्याही मुलीचे नाव नही आहे......सीतेचे दुसरे नाव जानकी, या अर्थाने)
आणी पुत्र असावा तर समर्थांसारखा.
मी लगेच ही माझी एच्छा महाराजांना सन्गीतली............आता पाहु महाराज काय करतात ते.....
पण एक गोश्ट आहे.......Man gets what he deserves not what he wants.

Tuesday 20 July, 2010

माझी पहिली गुरुपोर्णीमा:

'श्री राम समर्थ '



जेव्हा एखाद्याचा भूत काळ त्याच्या वर्तमानापेक्षा फारच चांगला असतो तेव्हा त्याला तो भूत काळ स्वप्नासारखा वटायला लागतो.
मला अनुग्रह मिळाल्यावर अवघ्या एकाच वर्षात महारजांनी गोंदावल्यात गुरुपोर्णीमेला जण्याचा योग आणला. आगोदर दर्शन झाले ते
समर्थांचे, महाराजांचे जणु गुरुच. मग मुक्कमाला गोंदावल्यात गेलो. महाराजांनी समोरच्या शाळेत रहाण्यची सोय केली. आणी काय..
न भुतो न भविश्यती:: महाराजांच्या सहवासत पुर्ण दीवस काढण्याचा योग आला.

जास्त लिहित नाही, कारण वरच बोलल्याप्रमाणे ते स्वप्न वाटेल.......
असेच योग महाराजांनी अयुश्यात आणवेत (केवळ त्यान्च्या क्रुपेमुळे...माझी काहीही पात्रता नसताना) हीच महाराजांचरणी प्रार्थना.

!! श्री राम समर्थ !!

Monday 12 July, 2010

'श्री राम समर्थ '

वा, वा, आज आणखीन एक गोश्ट realize झाली. जेव्हापासून finance मधे realization - recognition theory वाचली आहे तेव्हापासुन जास्तच realization होत आहे. असो:
रंगूनी रंगात सार्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा !!
हे पद शक्यतो नाथांबद्दल गायले जाते....तसे हे सर्व संताना लागु होते. आता मला काय उमजले...?
मला सगळ्या रन्गात रन्गून स्वतःचा रन्ग वेगळा राखणे अशक्य आहे. माझी झेप एवढीच. फार तर मी
कशातच न गुंतता अलिप्त राहु शकेन पण मोहात अडकून मग त्यातून सुटणे अशक्य आहे. त्या अभिमन्यु सारखे
ज्याला फ़क्त चक्रव्युह तोडणे माहित होत, त्यतून बाहेर येणे नाही.
मग याला उपाय काय......काय काय? सान्गीतलाच आहे की महाराजांनी. जेव्हा आपली खात्री पटते की परमत्म्या वाचुन आपल्याला तारणरं कोणच नाही तेव्हा आपल्याकढुन खरी साधना होते. आता बघु काय इच्छा आहे रामाची.

!! श्री राम समर्थ !!

Friday 9 July, 2010

'श्री राम समर्थ '

guru-parmpara of shree bramhachaitanya gondavalekar महाराज

•Adi Naarayan
•Lord Bramha
•Vasishtha Muni
•Shree Raamchandra
•Shree Samartha Raamdas Swami
•Shree Kalyan Swami
•Shree Baalkrishna
•Shree Chintamani
•Shree Raamkrishna
•Shree Tukaramchaitanya (Tukamai)
•Shree Bramhachaitanya

Thursday 8 July, 2010

"श्री राम समर्थ "

आज एक गोश्ट पक्की समजली. आपण कुठे चुकतो हे कळणे क्रमपात्र आहे. आयुश्याच्य शेवटी हे कळुन काहिही उपयोग नाही.नाहितर समर्थान्नि सान्गीतल्याप्रमणे "आला आला हा जीव, गेला गेला व्यर्थ गेला" अशी स्थीती व्हायची.
सध्याच्या जगात तरी चांगले वीचार येणे अशक्यच आहे.बरीच नामसाधना लागते त्याला. त्यामुळेच म्हणतो की चुक कळणे गरजेचे आहे. कारण आपण जे करतो ते सर्वच करतात,त्यात काय गैर आहे असे वाटले की सम्पलेच. असो पण "अनेक जन्माचे तप एक नाम" असे जेव्हा माऊली म्हणतात तेव्हाच स्पश्ट होते की नाम मूखी असणे किति कठीण आहे ते. पण नाम घेतल्याशिवाय आत्मप्राप्ती नाही आणी त्याशिवाय उदधार नाही.
समर्थांनी चार ओळीत नामाचे महत्व सांगीतले आहे:

जयाचेनी नामे महादोश जाती
जयाचेनी नामे गती पावीजेति !
जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा
प्रभाते मनी राम चिन्तीत जावा !!

Thursday 17 June, 2010

Beginning of Symbiosis Era in my life:

'श्री राम समर्थ '

कुठ्लीही नवीन गोश्ट आत्मसात करणे हे कठीणच असते. आर्थात सन्त याला अपवाद असतात, कारण ते सामान्य नसतात.ते विशेष कारणासाठी जन्माला आलेले असतात.
मलाही थोडे कठीणच गेले, रोज रामाला आणी महाराजाना भेटायचि सवय होति ना. आता बहुतेक जसे नामदेवाना विठ्ठ्लाने दूर पाठवले होते तसे राम मला पाठवत आहे अशी
मी माझी समजूत केलि आहे.असो, पण महाराज नेहमी म्हणतच असत की कुठ्ल्याही परिस्थीतित परमेश्वराचे अनुसन्धान टीकणे ही मी तुमच्या जवळ असल्याची खुण आहे.

य़ाचाच अर्थ असा आहे की महराज माझ्या जवळ आहेत. बहुतेक हे सान्गण्यासाठीच मला एथे पाठवले आहे.